कविता

विठ्ठल विठ्ठल

बायको जेव्हा लाडात येवून करते लाडिक हट्ट 
करून टाकते ती नवर्याला अगदी घट्ट 

एकदा माझी बायको मला म्हणाली लाडे लाडे 
यंदाच्या बोनासमध्ये म्याक्षी शिवून द्याना गडे 
बायकोच्या हट्टापाई चांगली दीडशे रुपयाची महागडी म्याक्षी घेतली 
घरी नेवून ती धुतली ,धुतल्याबरोबर ती आटली नि घालता घालता फाटली 
मी बायकोला चिडवले आत्ता कशी चटली 
तिने रागे रागे फेकून मारली मला तेलाची बाटली 
तितक्यात आली शेजारीण ,तिने उघडला दरवाजा 
ती बाटली शेजारणीच्या कपाळावर जावून आपटली 
नेमबाज बायको म्हणून मी तिची पाठ थोपटली 

दीडशे रुपये पाण्यात गेले 
म्हणून बायकोने सतत जेवणात आठ दिवस 
एकच भाजी केली पिठलं ,
ते खावून माझा मन विटलं ,
मग माझ मन संसारातून उठले 
आणि मग मी सुरु केले 
विठ्ठल विठ्ठल

No comments:

Post a Comment