Monday, 16 July 2012

नामदेवे रचिला पाया ! तुका झालाशी कळस !!

या देशात कुठले हि कार्य  भटानशिवाय  होवूच  शकत नाही.असे भटांना वाटते .म्हणून त्यांचा कुठे न कुठे भट घुसवण्याचा धंदा चालूच असतो .असेच या देशात संत नामदेव यांनी भागवत अर्थात वारकरी धर्माची स्थापना केली होती .पण त्यांनी केलेल्या कार्याचे सर्व श्रेय ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरानां तर दिलेच पण संत नामदे यांना देखील उपेक्षित ठेवले .
खरे पाहता संत  ज्ञानेश्वर हे  संत नामदेव यांच्या पेक्ष्या वयाने लहान होते .या बद्दल संत जनाबाई म्हणतात 
" नामदेव कीर्तन करी ! नाचे पांडुरंग !!
जनी म्हणे ज्ञानदेवा ! म्हणा अभंग !! "  कीर्तन करणारी व्यक्ती मोठी असते.अभंग म्हणणार्यान पेक्ष्या. म्हणून जनाबाई  ज्ञानेश्वरानां खडसावून सांगतात कि नामदेव कीर्तन करत आहेत. तुम्ही अभंग म्हणा .याचा अर्थ असा कि संत  ज्ञानेश्वर हे  संत नामदेव यांच्या पेक्ष्या वयाने लहान होते . पण भटांनी एक डाव टाकला . 
नामदेवे रचिला पाया ! तुका झालाशी कळस !! 
ह्या अभंगातला नामदेव हा शब्द काढून त्यांनी ज्ञानदेव  हा शब्द घातला .वास्तविक ज्ञानेश्वर यांचे नाव ज्ञानेश्वरच पण भटांनी ते घुसवंन्या साठी  ज्ञानदेव  केले .
आणि मग त्यांनी अभंग केला 
ज्ञानदेवे  रचिला पाया ! तुका झालाशी कळस !!   .....आमचे वारकरी बसले टाळ कुटत आणि हेच म्हणत .
बरे संत नामदेव यांना अख्खा भारत ओळखतो पण ज्ञानेश्वर यांचे महाराष्ट्रा बाहेर कार्यच मुळी शून्य .शिवाय ज्ञानेश्वरीत कुठेच पंढरपूरचा आणि विठ्ठलाचा उल्लेखच नाही .
पण संत नामदेव मात्र शब्दा शब्दाला विठ्ठलाचे महत्व सांगतात .संत नामदेव यांचा एवढा द्वेष का तर शिंपी जातीचे होते म्हणून ....आणि  ज्ञानेश्वर यांचा एवढा पुळका का तर ते ब्राह्मण होते म्हणून .
ज्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांना आयुष्यभर छळून फुटके खापर सुद्धा मिळू दिले नाही तेच ब्राह्मण आज त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपये कमावत आहेत .
आता एकाच केले पाहिजे .
" तुका म्हणे ऐश्या नरा ! मोजुनी हनाव्या पैजारा !!"

2 comments:

  1. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान /करावा आपण घेवू नये /प्रभू झाला तरी संसाराचा ध्यास /विहित तपास त्यांची सेवा /
    तुका म्हणे हे आशीर्वादे बळी /जाईल तो छळी नरकायासी /२३५१
    हरीभक्त संत संन्यासी आणि ब्राह्मण यांचा यथाशक्ती सत्कार करावा पण आपण त्यांच्याकडून सत्कार घेवू नये /एखादा सार्वभौम राजा असला तरी तो स्वतःच्या संसाराचा दास असतो म्हणून राजालादेखील ब्राह्मणांची सेवा करणे शास्त्रविहित आहे तुकाराम महाराज म्हणतात संत ,सन्यासी ,व ब्राह्मण यांच्यात आशीर्वाद देण्याचे सामर्थ्य असते म्हणून त्यायोगे ते बलवान असतात याकरिता जो त्यांचा छळ करेल तो नरकाला जाईल
    देवाचिया वस्त्रा स्वप्नीही नाठवी /स्त्रियेसी पाठवी उंच साडी /गाईचे पाळण नयेचि विचारा /अश्वासी खरारा करी अंगे /
    लेकराची गांड स्वये धावे क्षाळू /न म्हणे प्रभाळू द्विज पाय /तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका /जातो यमलोका भोगावा /१०९९
    लेकराचे ढुंगण धुण्याकरिता स्वतः धावतो ,पण ब्राह्मणाचे पाय धुवावेत असे तोंडाने सुद्धा म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा अधमांच्या तोंडावर थुंकावे कि जो पुढे नरक भोगण्याकरिता यमलोकाला जातो
    माझा स्वामी तुझी वागवितो लाथ /तेथे मी पतित काय आलो /
    तीर्थे तुमच्या चरणी झाली निर्मल /तेथे मी दुर्बल काय वाणू /
    तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वन्द्य मी तो काय निंद्य हीन जाती /११८५
    खान्दारकर महाराज संपादित तुकारामांच्या गाथेतील हे ब्राह्मणाबद्दलचे काही अभंग

    ReplyDelete
  2. हा ..महाराज .labbad आहे. वरिल अभंग घुसखोरितले आहेत ....तुकोबा समानता मानतात ..उच निच ता नाहि

    ReplyDelete