Tuesday, 22 May 2012

ब्राम्हणी साहित्याचा जाळीव इतिहास ;



ब्राह्मणी साहित्याचा जाळीव इतिहास पाहत असताना त्यामध्ये विविध ग्रंथांचा समावेश करता येईल.
 त्यामध्ये
महिलांची बदनामी करणारे
 १)वेदः उपनिषदे २)स्मृती :पुराने .
पण हल्लीच्या जाळीव इतिहासामध्ये दासबोध आधी जाळला पाहिजे .बघा हराम दास काय म्हणतो तो .


दासबोध : दशक ५ वा: मंत्रांचा
समास १ ला :- गरुनीश्चय .

गरु तो सकळांसी ब्राह्मण ! जरी तो झाला क्रियाहीन !!
 तरी तयासीच शरण ! अनन्य भावे असावे !!६!!

अहो या ब्राह्मणा कारणे ! अवतार घेतला नारायणे !
 विष्णूने श्रीवत्स मिरवणे !! तिथे इतर ते किती !!७!!

ब्राह्मण वाचणे प्रमाण ! होती शूद्रांचे ब्राह्मण !!
 धातू पाषाणी देवपण !! ब्राह्मनाचेनी मंत्रे !!८!!
सकळांसी पूज्य ब्राह्मण ! हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण !!
 वेद विरहित ते अप्रमाण !! अप्रिय भगवंता !!१० !!

असो ब्राह्मण सुरवर वंदती ! तेथे मानव बापुडे किती !
! ब्राह्मण जरी मूढमती !! तरी तो जगात वंद्य !! १५ !!

म्हणजे काय तर ब्राह्मण जरी मूढ -मूर्ख मती -बुद्धीने असला तरी तो जगात वंद्य ...बघा ..राम डासाचे लिखाण
.असले असमानता दर्शक लिखाण लोकशाहीतहि साहित्य दिंडीत खांद्यावर घेवून मिरवले जाते ...आणि आम्ही परिवर्तनवादी मात्र  गप्पच ...

2 comments:

  1. खांदारकर महाराज यांनी संपादित केलेली संत तुकारामांची गाथा यातील काही अभंग याखाली दिलेले आहेत देवाचिया वस्त्रा स्वप्नीही नाठवी/ स्त्रियेसी पाठवी उंच साडी /गाईचे पालन नयेचि विचार /अश्वासी खरारा करी अंगे /
    लेकराची गांड स्वये धावे क्षाळू /न म्हणे प्रक्षाळू द्विज पाय /तुका म्हणे त्यांचा तोंडावरी थुंका /जातो यमलोका भोगाया /१०९९
    लेकराचे ढुंगण धुण्यासाठी स्वतः धावतो पण ब्राह्मणाचे पाय धुवावेत असे तोंडाने सुद्धा म्हणत नाही /तुकाराम महाराज म्हणतात अशा अधमांच्या तोंडावर थुंकावे कि जो पुढे नरक भोगण्याकरिता यमलोकाला जात आहे
    उरा लावी उर आलंगीता कांता/संतासी भेटता अंग चोरी /अतिथी देखोनि होय पाठमोरा/व्याह्यासी सामोरा जाय वेगी /
    द्विजा नमस्कारा मनी भाव कैसा /तुर्काचे दासीचा लेक होय /तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे /स्वभावा करावे काय कोणी /११००
    ब्राह्मणांना नमस्कार करण्याकरिता मनात भाव कसा असणार ?पण मुसलमानाच्या दासीची सेवा करण्यकरीता जणू तिच्या पोटी जन्माला आलेला पुत्रच होतो
    राउलाशि जाता त्रास मानी मोठा /वैसे तो चोहोटा आदरेशी /न करी स्नान संध्या न म्हणे रामराम /गुडगुडीचे प्रेम अहर्निशी /
    देव ब्राह्मणांशी जायेना शरण /दासीचे चरण वंदी भावे /११०४
    माझा स्वामी तुझी वागवितो लाथ /तेथे मी पतित काय आलो/तीर्थे तुमच्या चरणी झाली निर्मल /तेथे मी दुर्बल काय वाणू /
    तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद /मी तो काय हीन जाती /११८५
    वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान /करावा आपण घेऊ नये /प्रभू झाला तरी संसाराचा दास /विहित तपास त्यांची सेवा /
    तुका म्हणे हे आशीर्वादे बळी /जाईल तो छळी नरकायासी /२३५१
    वांनगीदाखल हे संत तुकाराम यांच्या गाथेतील काही अभंग दिलेले आहेत सर्व अठरापगड जातीतील संताच्या अभंगामध्ये ब्राह्मण हे पूजनीय आहेत असे अभंग सापडतील तुम्हाला बहुतेक सर्व जातीच्या संतांचे ग्रंथ जाळून टाकले पाहिजेत

    ReplyDelete
  2. हि घुसखोरि आहे ....तुकोबा समानता मानतात .....मुनि ...विप्र ...हे शब्द तुकोबाकालिन नव्हेत ...तुकोबा मुस्लिम विरोधि न्हव्हते..उलत ..ते ब्राह्मनाना म्हंत्तात .
    संदुनिया राम राम l ब्राह्मन करिति दोम दोम l

    ReplyDelete