Thursday, 15 August 2013

हे स्वातंत्र्य खोटे आहे . ईथे लोकशाही कोठे आहे .


 स्वातंत्र्य मिळून आज जवळ जवळ ६० पूर्ण झाली . काय मिळाले आम्हाला . 

१)मराठ्यांना आरक्षण नाही , मुस्लिमांचे सच्चर कमिशन लागू  नाही , भटक्यांचे रेणके कमिशन धूळ खात पडले आहे . 
२) या देशात ५ लाख शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या . तरुण रोज   निराशेतून आत्महत्त्या करतात . 
३) स्त्रिया रस्त्यावर संडासला बसून बसून पोटाच्या आजाराने      तडपून तडपून या देश्यात मारतात . 
४) भूकबळी ज्याला गोंडस शब्दात कुपोषण म्हणतात . त्याचे प्रमाण सेन गुप्ता समितीला विचारा … हजारो बालके जेवायला न मिळाल्याने या देश्यात मारावीत ?


५) खा.ऊ.जा धोरण लागू करून हा देश तर खावून टाकलाच पण बाहेरच्या विदेशी लोकांना सुद्धा विकला हरामखोरांनी .
६)राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी , दर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यंग चित्रातून बदनामी , अहिल्यामाई होळकर यांची
बदनामी . ह्या देशाला काही नियमावली आहे कि नाही
७) बायकोला वाढदिवसाला विमाने भेट देण्यारे याच देश्यात , आणि जावयाची लग्नातील बोलनीची अंगठी न देता आल्यामुळे जीव देणारे हि ह्याच देश्यात .
८) १ १ हजार कोटींच्या बंगल्यात राहणारे ह्याच देश्यात आणि फुटपाथवर गाडी मागे घेताना झोपेतच चेग्रून मेलेले ह्याच देश्यात ९) शेतीला चोरून वीज घेतली म्हणून लग्नाला आलेल्या मुलीसमवेत जेल मध्ये जाणारा सर्वसामान्य शेतकरी.आणि कोटींचे घोटाळे करून सुद्धा मोकार फिरणारे राजकीय दरोडेखोर नेते. स्वातंत्र्य कुणाचे .
१०) इंग्रजांच्या काळात शेतीला १३% बजेट होते आणि आता ० % सुद्धा नाही …कस्ले स्वातंत्र्य । — 

2 comments:

  1. ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
    HAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. स्वातंत्र्यपूर्व काळात मोजकेच सम्राट इतिहासाला ज्ञात होते. पण आज साखरसम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट अशी सम्राटांची आणि त्यांच्या साम्राज्यांची यादी लिहून त्यांच्या संपत्तीची मोजदाद करायची झाल्यास आभाळाचा कागद अन समुद्राची शाई केली तरी पुरी पडणार नाही. केवढं हे कर्तुत्व ! ..त्यांच्या या साम्राज्य यज्ञात अनेक सर्वसामान्यांची आहूती पडली हे मात्र खरे !....

    ReplyDelete