Sunday, 2 June 2013

आपली न्याय व्यवस्थाच मुळी अन्याय व्यवस्था आहे .

शिक्षेमुळे कोणतीहि व्यक्ती परिवर्तित झाली नाही.  ऽनि होत हि नाही . उलट होतं काय तर तुरुंग म्हणजे गुन्ह्याची विद्यापीठे होवून बसतात .नवशिके , हौशी गुन्हेगार बाहेर येताना अट्टल ,निडर गुन्हेगार म्हणून बाहेर पडतात . जणूकाही ते पदवी घेवून बाहेर पडलेत . दिलेल्या शिक्षेमुळे त्यांना अनुभवी ,बिनचुक्या गुन्हेगारांचा सहवास लाभतो . आणि मग ते ट्रेन गुन्हेगार म्हनून बाहेर येतात . आणि मग आत शिकलेले फंडे वापरायला लागतात . 
तुरुंगात सुम्पूर्ण वातावरण एकाच गोस्ट  सांगत असते कि चोरी करणे , खून करणे ,बलात्कार , हा काही गुन्हा नव्हे , आपण पकडले जाने हा गुन्हा आहे . तेव्हा पकडले न जाता गुन्हा कसा  शिताफीने कारायचा ते शिकून घ्या . 
आपली सगळी न्याय व्यवस्थाच  मुळी अन्याय  व्यवस्था  आहे . शिक्षा देवून लोकांना सुधारायची कल्पनाच मुळी विचार करायला लावणारी आहे . खरे म्हणजे गुन्हेगारांना इस्पितळात ठेवण्याची गरज आहे . त्यांना मानसोपचार तज्ञाकडे नेले पाहिजे  नाही तर  नैतिक शिक्षण दिले पाहिजे. करुना  दाखवून उपचार केला पाहिजे . शिक्षा म्हणजे त्याच्यावर सूड उगवणे ,त्याच्यावर हि परिस्थिती  का आली हे जाणून घेणे नव्हे . 
ह्या देश्यात केवळ टाटा ,बाटा अंबानी यांसारख्या केवळ पंधरा व्यक्ती श्रीमंत आहेत . हेच खरे दरोडेखोर ,गुन्हेगार आहेत . कुत्र्यांना a .c . आहे यांच्या कडे ,१ १ कोटीचे बंगले . हजारो एक्कर जमिनी यांच्याकडे . हे तर घटना विरोधी आहे . पण कुठे आहे 
न्याय व्यवस्था . गरिबांना ५ २ एक्कर पेक्षा जास्त जमीन बाळगता यात नाही , शेतीला वीज नाही , गरिबांना न्याय नाही ….

1 comment:

  1. khupach chan lekh ahe sir... far avadla...!

    marmala sparsh karnara ani satyatechi baju dakhavinara asa lekh ahe..

    ambanikade 5000 koticha bangala ahe, jyache light bil dar mahinyala 80 lakh peksha jast yeta... 27 majali bangala ani tyat rahnare phkt 3 mansa ani 5 kutre...

    ani ikade garibala rahayla ghar nahi, shetkaryanna vij nahi..

    ReplyDelete